भुसावळ : लग्नात व्यवस्थित आंदण दिले नाही व कामधंदा येत नाही म्हणून तालुक्यातील दीपनगर येथील माहेर व मुंबई येथील सासर असलेल्या विवाहितेचा सासरच्यांनी छळ करीत मारहाण केली. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह सात जणांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सुषमा उर्फ राणी संघपाल तायडे (32, मिश्रानगर, भांडूप, मुंबई, ह.मु.दीपनगर) या विवाहितेने रीक्षा घेण्यासाठी माहेरून 50 हजार रुपये आणावेत म्हणून छळ करण्यात आल्यानंतर विवाहितेच्या वडिलांनी सासरच्यांना रक्कम दिली मात्र त्यानंतर रीक्षा दुरुस्तीसाठी 12 हजार रुपये आणावेत, लग्नात आंदन दिले नाही तसेच कामधंदा व्यवस्थित येत नाही म्हणून सासरच्यांनी छळ करीत मारहाण केली तसेच सासरी राहिल्यास ठार मारू, अशी धमकी दिली. 20 एप्रिल 2014 ते 15 फेब्रुवारी 2022 दरम्यान झालेल्या छळानंतर विवाहिता माहेरी निघून आल्या.
यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
विवाहितेने शनिवारी रात्री भुसावळ तालुका पोलिसात तक्रार दिल्यानंतर पती संघपाल देविदास तायडे, सासरे देविदास गिरधर तायडे, सासु ताईबाई देविदास तायडे, दीप प्रशांत देविदास तायडे (चौघे रा.मिश्रानगर, भांडूप, मुंबई), नणंद प्रिया राघवेंद्र सोनवणे, नंदोई राघवेंद मोतीराम सोनवणे (नेरूळ, मुंबई), माम सासरा रंगीलदास भागवत सुरवाडे (बेटावद खुर्द, ता.बोदवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय श्यामकुमार मोरे करीत आहेत.