भुसावळ- दीपनगर सरगम गेट समोरून जाणार्या दुचाकीस्वाराला भरधाव अज्ञात वाहनाने उडवल्याने एक दुचाकीस्वार (गाडी क्रमांक एम.एच.19 एटी.4002) जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. अत्यवस्थ अवस्थेतील दुचाकीस्वाराला भुसावळ तालुका पोलिसांनी वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्यांच्या वाहनातून गोदावरी रुग्णालयात हलवले. दीपक आठवले असे या जखमी दुचाकीस्वाराचे नाव असल्याचे समजते. याबाबत तालुका पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. आठवले यांच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.