भुसावळ- तालुक्यातील दीपनगर येथील भुसावळ औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन जनजागृती प्रशिक्षण कार्यशाळा अभियान राबविण्यात आले. या कार्यशाळेत टीम कमांडर अरुणकुमार बेरा व पथकाने आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देऊन प्रात्यक्षिके सादर केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्य अभियंता एन.जी.पुणेकर, उप मुख्य अभियंता मोहन आव्हाड, एन.आर.देशमुख, अधीक्षक अभियंता ए.ए.पेटकर, एम.बी.अहिरवार, आर.पी.रेड्डी, रडे, हिंमतराव अवचार, सुरक्षितता अधिकारी डी.डी.पिंपळे, दराडे, खाडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी आर.पी.निकम यांनी तर मनीष पाटील यांनी आभार मानले.