दीपनगरला जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रम

0

भुसावळ । दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात 21 रोजी जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सकाळी 6 ते 8 वाजेदरम्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे. सकाळी 6 ते 7 पुरक व्यायाम, योगासन, प्राणायाम, हास्ययोग आणि 7 ते 8 च्या दरम्यान योग गीत, मान्यवरांचे स्वागत, प्रस्ताविक, साधकांचे मनोगत, योगवार्ता पत्रक विमोचन, उपस्थित मान्यवरांचे मनोगत आणि आभार होईल. योग साधकांनी योगसाधनेसाठी येतांना शक्य असल्यास पांढरे व सैल कपडे परिधान करावे व आपापले आसन सोबत आणावी. तरी सर्व अधिकारी कर्मचार्‍यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात
आलेले आहे.