भुसावळ । महानिर्मिती या राज्य शासनाच्या वीज निर्मिती कंपनीच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले होते. यामध्ये 252 दात्यांनी रक्तदान केले. सकाळी वसाहतीमधील दवाखान्यात जिल्हा रुग्णालय आणि रोटरी क्लब ऑफ दिपनगरच्या सहभागाने शिबीर घेण्यात आले. यामध्ये कर्मचारी, अधिकारी, कंत्राटदार, कंत्राटी कामगारांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला.
रक्तदान हे आपले प्रत्येकाचे सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्य
याप्रसंगी जिल्हा रुग्णालयाचे रक्त संक्रमण विभागप्रमुख डॉ. उमेश कोल्हे यांनी रक्त दानाचे महत्व सांगून रक्तदान हे आपले प्रत्येकाचे सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे. रक्तदानामुळे आपल्या शरीरास होणारे फायदे याबाबत माहिती दिली. मुख्य अभियंता अभय हरणे यांनी सामाजिक उपक्रमांमध्ये दीपनगरचा नेहमीच सक्रीय सहभाग राहिलेला आहे. आज देखील आपण सर्वांनी रक्तदान करावे असे आवाहन केले. रक्तदान करणार्यांना 26 रोजी ध्वजारोहणाच्या प्रमुख कार्यक्रमात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येईल.
शिबीरात यांची होती उपस्थिती
यावेळी उपमुख्य अभियंता माधव कोठुळे, नितीन गर्गे, अधिक्षक अभियंता एम.पी.मसराम, एन.आर देशमुख, व्ही.एम. वारंगे, राजेश राजगडकर, एम.बी. पेटकर, सी.एन. निमजे, एम.बी. अहिरकर उपस्थित होते. सुत्रसंचालन शैला सावत यांनी, प्रास्तविक कल्याण अधिकारी पंकज सनेर यांनी केले. तर आभार डॉ. जयंत पाटील यांनी मानले.
यांनी केले सहकार्य
मागील शिबीरात 215 जणांनी रक्तदान केले होते. यावेळेस यात चांगला प्रतिसाद मिळून 252 जणांनी रक्तदान केले. यशस्वीतेसाठी दीपनगर रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डॉ.बी.एन. पाटील, रुग्णालय व्यवस्थापक डॉ. जयंत पाटील यांंसह कर्मचार्यांनी सहकार्य केले. रोटरीच्या वतीने अध्यक्ष प्रविण बुटे, सचिव आनंदगिर गोसावी, कोषाध्यक्ष मोहन सरदार, नितीन रडे, एम.डी.थेरोकार, आर.पी. निकम, यशवंत सिरसाठ, जे.पी. पाटील, कैलास लोहार, मिलींद धर्माधिकारी, अजय उभरहांडे, एल.एन. भंगाळे, संदीप पारखे, नितीन देवरे, डी.डी. पिंपळे, सुनिल चौधरी, राजू ताले यांनी सहभाग नोंदविला.