अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता ; लाखोंचे लोखंड जप्त
भुसावळ- दीपनगर सुरक्षा प्रकल्पातील चार लाख 10 हजारांचे लोखंड चोरी प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसांनी चार संशयीतांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे तर चोरीतील लोखंडोसोबतच लाखोंचे लोखंड पोलिसांच्या हाती लागले असून या गुन्ह्यातील आठ ते दहा आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. 660 प्रकल्पातील सुरक्षा विभागाचे अधिकारी मुकेश मोतीराम भोळे यांनी शुक्रवारी रात्री दीपनगर प्रकल्पातून 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारीदरम्यान रात्री ट्रॅक्टर (एम.एच.27-4891) मधून 10 ते 12 अज्ञात चोरट्यांनी चार लाख 10 हजार रुपये किंमतीचे लोखंड लांबवल्याप्रकरणी शुक्रवारी रात्री तालुका पोलिसात फिर्याद नोंदवली होती.
चोरटे जाळ्यात, अनेक गुन्हे उघडकीस
सुरक्षा यंत्रणेने दिलेल्या माहितीनंतर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजानन करेवाड व सहकार्यांनी चार संशयीतांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून लाखोंचे चोरी गेलेले लोखंड जप्त केले असून आणखी काही आरोपींना सायंकाळपर्यंत अटक होण्याची शक्यता आहे.