आमदार संजय सावकारेंच्या पाठपुराव्याने पुन्हा मिळाला रोजगार
भुसावळ- दीपनगर प्रकल्पातील 32 प्रकल्पग्रस्तांना कुठलेही कारण न दाखवता कामावरून कमी करण्यात आल्याने या कर्मचार्यांसह त्यांच्या कुटुंबियांवर बेरोजगारीचे संकट कोसळले होते. कामगारांनी आपली व्यथा आमदार संजय सावकारे यांच्याकडे मांडल्यानंतर न्याय मिळवून देण्याची विनंती केली. आमदार सावकारे यांनी तातडीने दखल घेत मुख्य कार्यालयातून सर्व माहिती मागवली व उर्जा मंत्री बावनकुळे यांच्याशी साधून बैठकीत 32 प्रकल्पगस्तांना न्याय मिळावा, अशी मागणी केली. बावनकुळे यांनी तत्काळ सूचना देऊन सर्व 32 प्रकल्पग्रस्तांना तातडीने कामावर रूजू करण्याचे आदेश दिले. 32 प्रकल्पग्रस्तांना आमदारांच्या पाठपुराव्याने न्याय मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
हतनूर धरणाचा प्रश्नही लागणार मार्गी
आमदार सावकारे यांनी हतनूर येथील सबस्टेशनचे काम देखील तातडीने पूर्ण व्हावे, अशी विनंती उर्जा मंत्र्यांकडे केल्यानंतर यावर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम पूर्ण करण्याकरीता येत्या 15 दिवसात टेंडर काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. काम पूर्ण झाल्यानंतर हतनूर, टाहकळी, कठोरा, सावतरनिंभोरा, काहूरखेडा, मानपूर आदी गावांना मोठा लाभ होणार आहे.