दीपनगरात पाचव्या मजल्यावरून पडल्याने मजुराचा मृत्यू

0
भुसावळ : दीपनगर प्रकल्पातील ईएम बिल्डींगवरून पडल्याने अकुश गायकवाड (45, निंभोरा बु.॥, ता.भुसावळ) या मजुराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.
जखमीस अत्यवस्थ अवस्थेत गोदावरी रुग्णालयात हलवले असताना डॉक्टरांनी मयत घोषित केले. दरम्यान, हा मजूर पाचव्या मजल्यावर मधमाशांचे पोळे तयार झाल्याने ते काढत असताना ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे.