दीपनगर केंद्रातील कंत्राटी कामगार कामावर रुजू

0

भुसावळ। दिपनगर औष्णिक विद्युत केंद्र येथे 22 मे पासून सुरु असलेल्या कंत्राटी कामगार काम आंदोलना दरम्यान व्यवस्थापन आणि कंत्राटी कामगार संघटना नेते यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन 24 मे च्या रात्रीपासूनच कंत्राटी कामगार कामावर रुजू झालेले आहेत.

महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे कंत्राटी कामगार अजून आंदोलनाच्या पवित्र्यात असून केंद्रीय पदाधिकार्‍यांचे आदेश जो पर्यंत येत नाही तो पर्यंत आंदोलन सुरु राहील अशी प्रतिक्रिया स्थानीय नेतृत्वाने दिली. व्यवस्थापनाने आंदोलनाची पूर्व तयारी करून ठेवल्यामुळे आणि जवळपास 90 टक्के कंत्राटी कामगार कामावर हजर झाल्यामुळे केंद्राचे कार्य निर्विघ्नपणे सुरु आहे. संच क्र.3 आणि 5 मधून 680 मेगावॉट वीज निर्मिती सुरु असून संच क्र.4 बॉयलर ट्यूब लिकेज मुळे दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. दि.27 पासून संच क्र.4 मधून वीज निर्मिती अपेक्षित आहे.