दीपनगर केंद्रातील बोगस नोकर भरतीचे प्रकरण चव्हाट्यावर

0

भुसावळ। येथील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात असलेल्या महाजनकोमध्ये नोकर भरती करताना नियमानुसार न केल्यामुळे हे प्रकरण चव्हाट्यावर आले असून यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरुन चौकशी करण्यात येत असल्याचे समजते. तसेच भुसावळ तालुका पोलीस स्थानकात देखील याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याबाबत कामकाज सुरु होते. दीपनगर केंद्रात महाजनकोमध्ये तंत्रज्ञ 3 या पदासाठी नोकर भरती करण्यात आली होती.

मात्र हि भरती नियमानुसार नव्हता बोगस नोकर भरती झाल्याच्या संशयावरुन उच्च स्तरावरुन चौकशी केली जात असल्याची माहिती मिळाली आहे. अनुकंपा तत्वावरील दोन व नियमित नोकरभरती प्रक्रियेतील सात अशा नऊ उमेदवारांनी बनावट कागदपत्र सादर करुन नोकरी पटकावल्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत दीपनगर प्रशासनाकडून पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. याबाबत तपासी अधिकारी तालुका पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खामगड यांना विचारणा केली असता याबाबत अद्याप कुणीही फिर्यादी आलेले नसल्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही.