भुसावळ । दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात मुख्य अभियंता म्हणून राजेंद्र बावस्कर यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. या निमित्ताने येथील विविध कर्मचारी संघटनांच्यावतीने त्यांचा स्वागत सत्कार करण्यात येत आहे. सर्व मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांचे प्रतिनिधित्व करणार्या महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
कर्मचार्यांचे सहकार्य गरजेचे
भविष्यात महानिर्मितीच्या निकोप वाढीसाठी मला आपल्या संघटनेचे सहकार्य अपेक्षित आहे. आपल्या सर्वांच्या सोबती आणि सहकार्यातूनच मला केंद्राचा आलेख उंचावत न्यायचा आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांनी दिली. संघटनेच्यावतीने मिलिंद खंडारे यांनी आभार मानून व्यवस्थापनास सकारात्मक कार्यात नेहमीच सहकार्य राहील अशी ग्वाही दिली.
यांची होती उपस्थिती
यावेळी संघटना अध्यक्ष मिलिंद खंडारे, सचिव चंद्रकांत सपकाळे, कार्याध्यक्ष अख्तर तडवी, प्रमुख सल्लागार मोहन सरदार, विशाल जोनवाल, आनंद मोघे, अशोक कांबळे, दीपक बागुल, विजयेंद्र साबळे, राहुल वाघ, सुनिल तायडे, विजय वाघ, रोशन वाघ, डी.डी. झोपे, छगन पवार, पी.एस. सूर्यवंशी, सुभाष राठोड, प्रशांत वाघ, मनोहर बार्हे, नारायण भोई, नितीन सोनवणे, एम.व्ही. मोरे, सुभाष राठोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.