दीपनगर केंद्रात शहिदांना अभिवादन

0

भुसावळ । दीपनगर विद्युत केंद्रात शहिद दिनानिमित्त शहिदांना अभिवादन करण्यात आले. प्रभारी मुख्य अभियंता माधव कोठुळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपमुख्य अभियंता नितीन गगे तसेच अधिक्षक अभियंता एम.पी. मसराम, राजेश राजगडकर, विजय बारंगे, एम.बी. पेटकर, एम.बी. अहिरकर, सी.एन. निमजे, एन.आर. देशमुख यांनी पुष्प वाहिली.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक कल्याण अधिकारी पंकज सनेर यांनी केले. सनेर यांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानाविषयी विस्तृत माहिती दिली. यावेळी जनसंपर्क अधिकारी मोहन सरदार तसेच सर्व विभाग प्रमुख, संघटना प्रतिनिधी आणि महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.