दीपनगर गेटसमोर मागासवर्गीय संघटनेचे धरणे आंदोलन

भुसावळ : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन शाखा, दीपनगरतर्फे विविध प्रकारच्या 21 न्याय मागण्यांसाठी दीपनगर गेट समोर मंगळवारी सकाळी आठ वाजेपासून आंदोलन सुरू करण्यात आले.. सचिव अख्तर तडवी यांनी संघटनेच्या 21 मागण्या पदाधिकारी आणि सभासदांना समजावून सांगितल्या.

या मागण्यांसाठी आंदोलन
वीज कायदा दुरुस्ती विधेयक – 2022 हे संविधानविरोधी, राज्याच्या हिताच्या विरोधात तसेच मागासवर्गीयांच्या घटनात्मक हक्कांच्या विरोधात असल्यामुळे त्यास महाराष्ट्र शासनातर्फे विरोध करण्यासाठी वीज कंपन्यांनी प्रस्ताव पाठवावा, तिन्ही कंपन्यांमधील सहाय्यक अभियंता ते उपकार्यकरी अभियंता या पदाच्या पदोन्नतीमध्ये मागासवर्गीय पदवीधारकअ भियंत्यांना सतत डावलण्यात आल्याने अन्याय दूर करावा, तिन्ही कंपन्यांमधील मागासवर्गीयांचा अनुशेष कंपनीच्या एकूण मंजूर व कार्यरत पदांच्या आकडेवारीसह विशेष भरती अभियान राबवून विनाविलंब भरण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. अध्यक्ष मिलिंद खंडारे यांनी मागण्या मंजूर न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. कार्याध्यक्ष रोशन वाघ यांनी मार्गदर्शन केले.

यांचा आंदोलनात सहभाग
याप्रसंगी उपाध्यक्ष आनंद मोघे, छगन पवार, प्रसिद्धी प्रमुख मनोज जमदाडे, प्रशांत वाघ, नितीन सोनवणे, दीपक गायकवाड, मोहन सरदार, महेश पागवाड, प्रकाश मावची, विशाल वसावे, विशाल जोनवाल, विजय वाघ, कुरुंदास जाधव, अमित बोरकर, विजेंद्र साबळे, मनोहर बार्‍हे, प्रशांत शिसोदे, अष्टपाल सोनवणे, सतीश ढवळे, हर्षद चौधरी, मुकेश मोरे, हर्षवर्धन निरभवणे, निंबाळकर, प्रबोध साळवे, रोशन बार्‍हे, फिरोज तडवी, गिरीष राऊत, विशाल आढाव, गोपाल इंगळे, भारत चावरीया, संदीप सपकाळे, संतोष वानखेडे, स्वप्नील जाधव, अमोल अहिरे, नितेश खंडारे, संतोष पंतोजी, कमलकिशोर जामनिक , प्रमोद ढवळसंक, अमोल निकम , विलास घोपे, हरीश काशीकर, शेख इरफान, ज्योतीकुमार, नसीम बागुल , अप्पा राठोड, प्रितीलाल राठोड, सुभाष मेश्राम, निळकंठ शिंदे, सुभाष राठोड, महिला सदस्य मोहिनी फेगडे, निमिषा आव्हाड, सारीका वाघ, शारदा इशी, सुशीला सपकाळे, शिल्पा केसापुरे, वृषाली गायकवाड, अश्विनी जाधव, मिनाज पठाण, स्नेहल ठाकरे, सुमेधा केदारे, प्रतीक्षा मुंडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शाखाध्यक्ष मिलिंद खंडारे तर आभार कार्याध्यक्ष रोशन वाघ यांनी मानले.