Gates of Deepnagar project closed due to drunkenness: Crime against oneभुसावळ : दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पाचे गेट दारूच्या नशेत बंद करून येणार्या-जाणार्यांना अटकाव केल्याप्रकरणी एकाविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुका पोलिसात एकाविरोधात गुन्हा
गणेश रामदास चौधरी (48, गणेश कॉलनी कन्हाळे बु.॥) यांच्या फिर्यादीनुसार, संशयीत दुर्गेश कोलते (पूर्ण नाव माहित नाही, निंभोरा) यांनी 17 रोजी सायंकाळी 5.28 वाजेच्या सुमारास दीपनगर पाचशे मेगावॅट प्रकल्पाचे गेट बंद करून जाणार्या-येणार्यांना अटकाव केला तसेच सुरक्षा रक्षकांनी हटकल्यानंतर त्यांना शिविगाळ करण्यात आली. तपास हवालदार प्रेमचंद सपकाळे करीत आहेत.