भुसावळ- दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील मनीष इंटरप्राइजेस व स्पेस टच इंटरप्राइजेसमध्ये कामाला असलल्या कंत्राटी कामगारांना नियमाप्रमाणे वेतन मिळावे, भविष्य निर्वाह निधीची 2011 पासून कापलेली रक्कम खात्यात जमा करावी, राष्ट्रीय सुट्यांचे वेतन द्यावी, सर्व प्रकारचे भत्ते द्यावेत तसेच पगाराची पावती द्यावी आदी मागण्यांसाठी कामगारांनी मंगळवारपासून उपोषण छेडले आहे. मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय होईस्तोवर उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचार्यांनी केला आहे.
यांचा उपोषणात सहभाग
या उपोषणात हेमंत बापू मोरे, विनायक पुंडलिक सोनवणे, जितेंद्र शिवदास जाधव, अनिल सोमा जमदाडे, राजू हिरामण समधीर हे सहभागी झाले आहेत. या उपोषणाला संघटना प्रतिनिधी तथा केंद्रीय उपाध्यक्ष सचिन भावसार, केंद्रीय सचिव महाराष्ट्र प्रदेश महिला प्रतिनिधी चंद्रा अवस्थी, केंद्रीय उपाध्यक्ष विक्रम चौधरी, स्थानिक अध्यक्ष विश्वनाथ सोनवणे, सचिव सुनील शिंदे, गणेश टेकाडे, मजदूर संघ महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ सर्व सभासद व प्रतिनिधिंनी पाठिंबा दर्शवला आहे.