दीपनगर प्रकल्पात कोळसा चोरणारे दोघे जाळ्यात तर अन्य दोघे पसार

0

भुसावळ- दीपनगर प्रकल्पातील वीज पॉइंटजवळील 200 किलो कोळसा चोरून नेतांना तेथील सुरक्षा रक्षकांनी सुपडू कैलास सोनवणे आणि विजय दिनकर सोनवणे (रा. फेकरी, ता. भुसावळ) यांना सुरक्षा रक्षकांनी पकडले तर अन्य दोघे पसार झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. संशयीतांना तालुका पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले असून त्यांच्याकडून एक हजार 600 रुपये किंमतीचा दोनशे किलो कोळसा जप्त करण्या आला. तपास सहाय्यक फौजदार कमा काझी करीत आहेत.