भुसावळ। दीपनगर प्रकल्पात अल्प कोळशाचा साठा असल्यामुळे दोन्ही संच बंद करण्यात आले असून अवघ्या एका संचातून वीज निर्मिती होत आहे.
ओल्या कोळशामुळे संच बंद ठेवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दीपनगरातील संच क्रमांक तीन रविवारी बंद करण्यात आल्यानंतर सोमवारी रात्री 11 वाजता संच क्रमांक चारही बंद करण्यात आला तर संच क्रमांक पाचमधून केवळ 286 मेगावॅट वीज निर्मिती होत असल्याचे सांगण्यात आले.