Migrant worker died of heart attack in Deepnagar project भुसावळ : तालुक्यातील दीपनगर प्रकल्पात नरेशराम शारदाराम (52, दवनाहा, ता.दहावा, जि.वेस्ट चंपारन, बिहार) या कामगाराचा गुरुवारी सकाळी पावणेदजा वाजता आयसीपीएल प्लँटमध्ये काम करीत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला.
तालुका पोलिसात नोंद
तत्पूर्वी या कर्मचार्यास भुसावळ ग्रामीण रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक योगेश पालवे करीत आहेत.