राज्यातील जुने प्रकल्प टप्प्या-टप्प्याने बंद होणार – बावनकुळे
दीपनगर :– राज्यातील 25 वर्ष जुने असलेले वीज प्रकल्प बंद करून नव्याने त्याचे एक्स्पान्शन करण्यात येत असून दीपनगरच्या नव्या 660 प्रकल्पामुळे राज्याचे 900 कोटी रुपये वाचले असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिले. दीपनगरातील 660 मेगावॅट प्रकल्पाचे तसेच अन्य 13 वीज उपकेंद्रांचे रिमोटद्वारे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी बावनकुळे बोलत होते. प्रत्येक ग्रामपंचायत यापुढे सौरऊर्जा प्रकल्प सुरु करण्याची घोषणा त्यांनी येथे केली. जळगाव जिल्ह्यावर शासन पाच हजार कोटी रुपये खर्च करत असले तरी शेतकर्यांकडे दोन हजार 400 कोटी रुपये थकबाकी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत किमान पाच हजार रुपये भरावे, अशी अपेक्षा त्यांनी शेतकर्यांकडून व्यक्त केली.