भुसावळ । येथील दीपनगर विद्युत केंद्रातून राख वाहुन नेणारी पाईप लाईनची चोरी करण्याचा प्रकार सोमवार 8 रोजी पहाटे 4.40 वाजेच्या सुमारास उघडकीस आला. यात चोरेलेले पाईप वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे ट्रॅक्टरसह पाईपलाईन असा 2 लाख 66 हजाराचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. दीपनगर विज निर्मिती केंद्रातून राख वाहून नेणारी जलवाहिनी निंभोरा बंड परिसरातून टाकण्यात आली आहे.
दोघांविरुध्द गुन्हा दाखल
फेकरी येथील सुलतान शहा सलीम शहा (वय22), जुबेर शहा जाकीर शहा (वय 24) हे दोघेही ट्रॅक्टर (एम.एच. 19, एएन0534) घेऊन निंभोरा बंड भागात गेले. येथून 66 हजार रुपये किंमतीचे एमएस पाईप 300 एमएम 4 टन वजनाचे 55 मीटर लांबीचे पाईप चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र येथील सुरक्षा कर्मचार्यांच्या हि बाब लक्षात येताच त्यांनी चोरीस गेलेल्या पाईपांसह ट्रॅक्टर असा एकूण 2 लाख 66 हजाराचे साहित्य जप्त केले आहे. तसेच सुलतान शहा सलीम शहा, जुबेर शहा जाकीर शहा यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुपडा पाटील करीत आहे.