भुसावळ । रोटरी क्लबतर्फे दिपनगर येथे पोलिओमुक्त भारत अभियानांतर्गत लसिकरण अभियान राबविण्यात आले आहे. यात वसाहतीमधील 376 बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले.
आशा स्वयंसेविका वर्षा चव्हाण आणि सुरेखा पवार यांनी कामकाज केले. याप्रसंगी रोटरीचे अध्यक्ष प्रविण कुटे, सचिव आनंदगिर गोसावी, कोषाध्यक्ष मोहन सरदार, सुनिलदत्त पवार, जे.पी. पाटील, नितीन रडे, एन.एस. कोंडावले, एल.एन. भंगाळेे, रवी कछवा, वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, व्यवस्थापक डॉ. जयंत पाटील उपस्थित होते.