‘दीपवीर’च्या लग्नाचे काही फोटो व्हायरल!

0

इटली – दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचा लेक कोमो इथल्या व्हिलामध्ये पारंपरिक कोंकणी पद्धतीने विवाह पार पडला. दीपिका आन रणवीरने विवाहाचा एकही फोटो व्हायरल होता कामा नये म्हणून कडक बंदोबस्त केला होता. विवाह सोहळ्याला केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्र हजर होते.

https://www.instagram.com/p/BqKyyZNjKWq/?utm_source=ig_embed

मात्र, आता या विवाहाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. गेली दोन दिवस त्यांच्या विवाह विधींना सुरुवात झाली होती. त्यांचा संगीत सोहळा दिमाखदार पद्धतीने पार पडला. कोंकणी पद्धतीने विवाह संपन्न झाल्यानंतर आज सिंधी पद्धतीने दीप- वीर विवाहबद्ध होणार आहेत.

या विवाह सोहळ्याला बॉलिवूड सेलेब्रिटी हजर नाहीत असे समजते. त्यांच्यासाठी मुंबईत २८ नोव्हेंबरला ग्रँड हयातमध्ये शाही रिसेप्शन आयोजित केले आहे.