‘दीपवीर’च्या लग्नानंतर रणबीरवर खिल्ली उडवतानाचे मीम्स

0

मुंबई : बॉलीवूडचे बाजीराव मस्तानी म्हणजेच दीपिका आणि रणवीर यांचं इटली येथे लग्न थाटात पार पडले. यांचे लग्न कोंकणी आणि सिंधी अशा २ पद्धतीने करण्यात आले. यांच्या लग्नाच्या फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. आता दोघांच्या लग्नानंतर नेटिझन्स रणबीर कपूरची खिल्ली उडवत आहे.

रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण काही काळ रिलेशनशिपमध्ये होते. यामुळे चाहत्यांनी रणबीरची फोटोच्या माध्यमातून खूप खिल्ली उडवली आहे. काही फोटोज शेअर करत युजर्सने लिहिले की, दीपवीरच्या लग्नात रणबीर कपूर या काही खास अंदाजात दिसला.