दीपवीर हनीमूनला रवाना !

0

मुंबई-बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असेलेल जोडपी म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह. दोघांचे लग्न होऊन दीड महिना झाला आहे. बिझी शेड्युलमुळे दोघांनाही एकमेकांबरोबर वेळ घालवण्यासाठी वेळ मिळत नव्हता. दोघांच्या लग्नाकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले होते. त्याचप्रमाणे हे दोघे हनीमूनसाठी कोणत्या ठिकाणी जाणार याचीही सा-यांना उत्सुकता होती. अखेर वेळात वेळ काढून दोघेही हनीमूनसाठी रवाना झाले आहेत.

काल रात्री मुंबई एअरपोर्ट वर दोघेही हातात हात घालून दिसले. विशेष म्हणजे दोघांनीही यावेळी ब्लॅक कलरचे ड्रेस परिधान केले होते. रणवीरने ब्लॅक पॅंट, प्लेन टी-शर्ट आणि बाइकर लेदर जॅकेट परिधान केला होता.तर दीपिकाने ही ब्लॅक स्कर्ट आणि जैकेट परिधान केला होता. नेहमीप्रमाणे यावेळीही दोघांच्या हटके स्टाइल स्टेटमेंटही सा-यांचे लक्ष वेधून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. दोघांसाठी त्यांचे हनीमूनही थोडे खास असणार आहे. ते म्हणजे लग्नानंतर त्यांचे हे पहिले न्यु इअर असणार आहे.

विशेष म्हणजे दोघांनाही विविध देशांच्या पर्यटन मंडळांकडून पेड हनीमून ट्रीप पॅकेजेस ऑफर करण्यात आले होते. यांत स्वित्झर्लंड पर्यटन मंडळ आघाडीवर होते. कारण रणवीर सिंह हा स्वित्झर्लंड पर्यटन मंडळाचा भारतातील ब्रँड अॅम्बेसेडर आहे. या नवदाम्पत्याला सुंदर ठिकाणी हनीमूनला जाण्यासाठी खास आमंत्रण पाठवण्यात आले होते.