नवी दिल्ली । भारताच्या दीपा कर्माकारने रिओ ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिकमधील प्राडुनोव्हा प्रकारात चौथे स्थान मिळवत सगळ्यांचे लक्श वेधून घेतले होते. आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवत दीपाने प्राडुनोव्हा प्रकाराऐवजी व्हॉल्ट ऑफ डेथ म्हणून ओळखल्या जाणार्या हँडस्प्रिंग 540 प्रकारात हात अजमावण्याचे ठरवले आहे.एप्रिल महिन्यात करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेमुळे दीपाला आशियाई स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. आताही ती कॅनडात होणार्या जागतिक अजिंक्यपद जिम्नॅस्टिक स्पर्धेला जाणार नाही.
त्यामुळे पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणार्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी तयारी करताना प्राडुनोव्हाच्या ऐवजी स्प्रिंगफिल्ड 540 अंश प्रकारला पसंती दिली आहे. बुधवारी 24 वा वाढदिवस साजरा करणारी दीपा म्हणाली की, ऑस्ट्रेलियातील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये हॅडस्प्रिंग 540 प्रकाराचा समावेश आहे. या प्रकारात हवेत गिरक्या मारव्या लागतात. हा कठीण प्रकार असला तरी प्रोडुनोव्हापेक्शा जास्त कठिण नाही.