मुंबई : बॉलीवूडची मस्तानी दीपिकाचं दुसरं वेडिंग रिसेप्शन नुकतंच पार पडलं. या वेडिंग रिसेप्शनसाठी दीपिकाची पसंती प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबु जानी आणि संदीप खोसलाच्या लेहंग्याला होती. दीपिकासाठी या दोन्ही डिझायनरनं खास मोती, सफेद आणि सोनेरी छटा असलेला चिकनकारी लेहंगा तयार करून घेतला होता.
हा सुंदर लेहंगा आणि त्यावरील दागिने तयार करण्यासाठी तब्बल १६ हजार कारागीरांनी मेहनत घेतली होती. अबु जानीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लेहंगा तयार करतानाचा एका व्हिडिओ शेअर केला आहे.