दीपिकाच्या फेक न्यूड फोटो धुमाकूळ

0

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन पुन्हा एकदा सिनेमामुळे किंवा सिनेमातील भूमिकेमुळे नाहीतर एका न्यूड फोटोमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियात गेल्या काही दिवसांपासून एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यात दीपिका एका मॅगझिन कव्हरसाठी न्यूड पोज देताना दिसत आहे. मॅक्झिम या मॅगझिनचे कव्हर पेज आहे. त्यामुळे इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली आहे. मात्र दीपिकाचा हा फोटो फेक असल्याचे समोर आले आहे.

खरंतर दीपिकासारख्या अभिनेत्रीने असे करणे कुणालाही पचणी पडत नाही. मात्र हा फोटो सोशल मीडियात वार्यासारखा व्हायरल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. चरुळा या मॅगझिनला याबाबत विचारणा करण्यात आली, तेव्हा हा फोटो फेक असल्याचे उघड झाले. कुणीतरी हा फोटो फोटोशॉप करून व्हायरल केल्याचे समजते.

मॅक्झिम मॅगझिनकडून सांगण्यात आले की, यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. कारण यामुळे ब्रॅन्डची बदनामी होती आहे. तसेच या घटनेमुळे दीपिकाच्या इमेजलाही डाग लावण्याचा प्रयत्न झाला आहे. आम्ही लवकरच दीपिकाच्या टीमसोबत बोलून यावर कारवाई करणार आहोत. या फोटोमध्ये दीपिका एका न्यूड मॉडेलसोबत न्यूड पोज देताना दिसत आहे. याआधीही दीपिकाचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यावरून दीपिकाला लोकांनी ट्रोल केले होते. सध्यातरी दीपिकाच्या टीमकडून यावर काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.

याआधीही प्रियांका चोप्रोचे असे न्यूड फोडो सोशल मिडीयात व्हायरल झाले होते. मोर्फींग करून हे फोटो बनवले जातात आणि ते सोशय मिडियात प्रसारीत केले जातात. मात्र त्यामुळे संबंधित अभिनेत्रीची बदनामी होत असते. त्यामुळे त्यावेळी प्रियंका चोप्राने याला आक्षेप घेतला होता. आता दीपिका यावर काय भूमिका घेणार आहे, हे लवकरच समजणार आहे.