मुंबई: सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा वातावरण दिसून येत आहे. बहुचर्चित जोडप्यांमध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाच्या चर्चांनीही रंगत चढली आहे. माहितीनुसार, लवकरच ते दोघेही लग्नबेडीत अडकणार असल्याच्या चर्चा आहेत. अशातच रणवीरही त्याचे दीपिकापवरील प्रेम सर्वांसमोर व्यक्त करत असतो.
https://www.instagram.com/p/BmyPiRrhSS5/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_loading_state_control
दीपिकाने सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोने रणवीर सिंग घायाळ झाला आहे. त्याने तिचा फोटो पाहून ‘घायाळ’ (melting) अशी कमेंट केली आहे. दीपिका व रणवीर दोघेही एकमेकांच्या फोटोला सोशल मीडियावर लाईक करत असतात. दीपिकाही रणवीरच्या फोटोवर ‘माईन’ (mine) अशी कमेंट करत असते.
त्यांच्या लग्नाबाबत बोलायचे झाले तर, त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. इटलीतील ‘लेक कोमो’ येथे ते लग्न करणार असल्याच्याही चर्चा आहेत.