मुंबई : बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचा डेस्टिनेशन विवाह पार पडला. यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन हे फोटो शेअर केले.
कोकणी पद्धतीने इटलीतील लेक कोमो येथे विवाह संपन्न झाल्यानंतर सिंधी पद्धतींच्या विधींना सुरुवात झाली आहे. यावेळी दीपिका-रणवीर मरुन रंगाच्या जोड्यामध्ये दिसले. दीपिकाने लग्नात जी ओढणी घेतली आहे, त्याच्या किनाऱ्यावर ‘सदा सौभाग्यवती भव:’ असे लिहिले आहे.
सिंधी प्रथेमध्ये नवऱ्या मुलाच्या कुटुंबाकडून नवरीला लहंगा दिला जातो. ही ओढणी सुद्धा दीपिकाला रणवीरच्या कुटुंबाकडूनच मिळाली आहे.