मुंबई- प्रभादेवीतील वीर सावरकर रोडवरील ब्यूमॉन्ट बिल्डिंगला दुपारी दोन वाजता आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या १० गाड्या आणि ३ वॉटर टँकर घटनास्थळी रवाना झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. या आगीत बिल्डिंगमध्ये काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच बिल्डिंगमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण हीचं घर आणि ऑफिसही आहे.
या इमारतीच्या 26 व्या मजल्यावर दीपिकाचा ४ बीएचकेचा फ्लॅट आहे. याशिवाय बिजनेसमॅनची ऑफिसेस या इमारतीत आहे. ही आग कशामुळे लागली याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही.