पहिल्यांदाच जगातील सर्वात मादक आशियाई महिला म्हणून बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन हिची निवड झाली आहे. चार वेळा विजेती ठरलेल्या प्रियांका चोप्राला मागे टाकत या यादीत दीपिकाने पहिल्या क्रमांकावर जागा मिळवली आहे.
१. ‘ईस्टर्न आय’ या ब्रिटनच्या वृत्तपत्रात ही वार्षिक यादी देण्यात आली आहे. दीपिका यावर प्रतिक्रिया देताना म्हणाली की, माझ्या चेहर्यावर या गोष्टीमुळे स्मित आले आहे. पण वेगवेगळ्या लोकांसाठी सेक्सी या शब्दाचा अर्थही वेगळा असतो.
२. माझ्यासाठी हे केवल शारीरिक नाही. आत्मविश्वास सेक्सी आहे. साधेपणा आणि भाबडेपणा सेक्सी आहे. जगभरातील लाखो लोकांनी २०१६ मध्ये सेक्सी महिला निवडण्यासाठी व्होट दिले.
३. दुसर्या क्रमांकावर प्रियांका चोप्रा, निया शर्मा तिसर्या स्थानावर व चवथ्या स्थानावर श्रद्धा कपूर आणि आलिया भट पाचव्या स्थानावर आहे. पहिल्या दहा अभिनेत्रींमध्ये सनाया इराणी (सहाव्या), कतरिना कैफ (सातव्या, सोनम कपूर (आठव्या), माहिरा खान (नवव्या) आणि गोहर खान(१०व्या) क्रमांकावर आहे.