नवी दिल्ली : रणबीर सिंग आणि दीपिका पदुकोण ही जोडी किती वेळा तुटली आणि पुन्हा जुळली याच्यावर दोन वर्षात खूप खूप लिहून झालंय. आता त्या दोघांची एंगेजमेंटही झालीय अशा गॉसिप सुरू झाल्यात. त्यांनी मात्र यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. आताच संजय लिला भन्साळीच्या पद्मावती चित्रपटाच्या शूटींगमध्ये ते एकत्र दिसले आहेत.
२५ जुलै रोजी ‘डेक्कन क्रोनिकल’ने पुन्हा एकदा दिपिका-रणबीरच तुटलं, अशी घोषणा केली. आता मात्र क्रोनिकल सांगतंय, की दीपिका-रणबीर खूपच जवळ आहेत. असं म्हणतात, की ते दोघं दूर गेले म्हणून तुटले आणि तुटण्याला काहीच कारण नव्हतं. आता असं झालंय की ते संजय लिला भन्साळीच्या पद्मावती चित्रपटासाठी सकाळपासून शूटींगमध्ये एकत्र आहेत. शेवटी बाजीराव मस्तानी रिलिज झालेला तेव्हा रणबीर म्हणाला ते सत्यच होतं असं वाटयला लागलंय. तो म्हणाला होता की दीपिकाशी माझी दैवी दोस्ती आहे.
बाजीराव मस्तानीच्या निमित्ताने दीपिका-रणबीरवर स्तुतिसुमने उधळली गेली. त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली होती. भन्साळीच्या राम लिला चित्रपटाच्यावेळीच ही जोडी दुरावल्याच्या अफवा पसरल्या होत्या. आता भन्साळीच्या ‘पद्मावती’निमित्त ही जोडी एकत्र आलेली आहे.