दीपिका, शूर्पणखेप्रमाणे तुझं नाक कापू

0

करणी सेनेची दीपिकाला जाहीर धमकी

लखनऊ : मपद्मावतीफचं प्रदर्शन कुणीही रोखू शकत नाही, असे वक्तव्य करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्यावर हल्ला करण्याची धमकी करणी सेनेने दिली आहे. मआम्हाला डिवचण्याचे उद्योग बंद न केल्यास दीपिका पादुकोणचे नाक कापून टाकू,फ अशी धमकी करणी सेनेने दिली आहे. मपद्मावतीफच्या प्रदर्शनाविरोधात 1 डिसेंबर रोजी मभारत बंदफची घोषणाही त्यांनी केली.
राजस्थानातील करणी सेनेने सुरुवातीपासूच या चित्रपटाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना मारहाण करण्यापासून सेट जाळण्यापर्यंतच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. इतका विरोध होत असतानाही, मपद्मावती प्रदर्शित होणारच. कुणीही ते रोखू शकत नाहीफ, असा वक्तव्य दीपिकाने केले होते. त्यामुळे करणी सेनेचा तीळपापड झाला आहे.

का आहे चित्रपटाला विरोध
राणी पद्मिनीच्या जीवनावर आधारित मपद्मावतीफ चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आली असून राजपूतांचा अपमान करण्यात आल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे. करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र नाथ यांनी आज लखनऊ येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली.

मपद्मावती हिंदूंच्या भावना दुखावणारा चित्रपट आहे. त्यासाठी भन्साळींना दुबईतून पैसा मिळाला आहे. दाऊद इब्राहिमने त्यांना दुबईमार्गे पैसा पुरवला आहे. पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा चित्रपट येऊ देणार नाही,फ असं त्यांनी ठणकावून सांगितलं. दीपिका पादुकोणचं नाक कापण्याची जाहीर धमकीही त्यांनी यावेळी दिली.

विविध संघटनांचा विरोध
पद्मावती या चित्रपटला सुरुवातीपासूनच विरोध होत आहे. जयपूरमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विरोध झाला होता, तर खुद्द भन्साळींना मारहाणही करण्यात आली होती. महाराणी पद्मावतीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. राणी पद्मावती तिच्या सौंदर्य, बुद्धी आणि साहसासाठी लोकप्रिय होती. राणी पद्मावती आणि राजामध्ये काही इन्टिमेट सीन्स आहेत, तसेच या चित्रपटातून चुकीचा इतिहास मांडला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे.