भुसावळ/जळगाव : शहरातील एका भागातील संशयीत आरोपीने भावाला ठार मारण्याची धमकी देत आपल्या वहिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून दीर व सासरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात पोलिसात गुन्हा
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील एका भागातील महिला एकटीच राहत असून तीचा पती, सासरे, सासू व दीर हे दुसरीकडे राहतात. तीन चार दिवसांपासून त्या महिलेचा पती तिच्या घरी न आल्याने शुक्रवार, 24 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ती महिला तिच्या सासरच्यांकडे गेली. या ठिकाणी त्या महिलेने सासर्यांना पतीबद्दल विचारले असता, ते म्हणाले की, घरी आला नसून तो मरुन गेला आहे तर महिलेने दीराला तुमचा मोठा भाऊ कोठे आहे ? याबाबत विचारण केली असता, तो म्हणाला की, त्याला मरु दे असे म्हणत त्या महिलेसोबत अश्लिल बोलत तिच्यासोबत अश्लिल वर्तन केले तसेच त्या महिलेच्या पतीला मारण्याची त्याने धमकी दिली. यावेळी त्या महिलेच्या सासर्याने देखील तिला शिविगाळ करीत तिचा विनयभंग केला. याप्रसंगी त्या महिलेने त्यांच्या तावडीतून आपली सुटका करीत त्या ठिकाणाहून पाय काढला. या प्रकरणी शनिवार, 25 रोजी सासरे व दीर यांच्याविरुद्ध तक्रार दिली असून त्यानुसार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.