दुईजवळ ट्रकच्या धडकेत बुलढाण्याचा युवक ठार

0

मुक्ताईनगर- तालुक्यातील दुई गावाजवळ अज्ञात ट्रकच्या धडकेने दुचाकीवरील बुलढाणा येथील 23 वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना 28 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. पुरनाड फाट्याकडून डोलारखेडा फाट्याकडे मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास करण हरिचंद्र जाधव (23) व आकाश अशोक कंकाळ (23, दोघे रा. बुलढाणा) दुचाकी (एम.एच.28 एक्स 1959) ने जात असतांना डोलारखेड्याकडुन पुरनाडफाट्याकडे येणार्‍या अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने करण जाधव हा जागीच ठार तर आकाश कंकाळ हा जखमी झाला. या प्रकरणी कंकाळ याच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रकचालकाविरूद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार सुभाष पाटील करीत आहे.