दुकानदारांच्या वीजमिटरची नासधूस

0

वरणगाव । येथील रेल्वे स्टेशन रस्त्यावरील व्यावसायिक दुकानदारचे एका अज्ञात माथेफिरुने इलेक्ट्रीक मीटर बोर्ड, फ्युज, वायर कापून नासधूस केल्याची घटना 10 रोजी रात्री घडल्याने येथील व्यावसायिकांनी अज्ञात माथेफिरूविरुध्द वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात तक्रार केल्याचे येथील व्यवसायीकांनी सांगीतले.

आधीही घडल्या चोरीच्या घटना
10 रोजी रात्रीच्या दरम्यान रेल्वे स्टेशन रस्त्यावरील व्यावसायिक हितेंद्र नरेंद्र माळी कॉम्प लॅक्समधील दुकानदार लेडीस टेलर्स विजय सैतवाल, फोटोग्राफर महेश वनारा, निमजाय माता हॉस्पिटल डॉक्टर रुपेश पाटील, शेजारी फोटोग्राफर प्रशांत झोपे, त्रिमृती जनरल स्टोअर्स आदी दुकानदारांचे वीजमिटर बोर्ड, फ्युज, वायर कापून तोडफोड करून नुकसान करण्यात आले आहे. या परिसरात व्यावसायिकांनी दुकांनाचे व मालमत्तेचे रक्षणासाठी एका सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली असून या आधीही किरकोळ चोरीच्या घटना घडलेल्या आहे.