दुकानदार देणार सामूहिक राजीनामे

0

भामेर । रेशन दुकारांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाकडून ऑनलाईन व्यवहारासाठी पॉईट ऑफ सेल(पॉस) मशिन बळजबरीने वाटप करण्यात आले असून रेशन दुकानदार सामुहिक राजीनामे देणार आहेत. यासंदर्भांत साक्री विश्राम गृहात शुक्रवार 30 जून रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला सर्व रेशन दुकानदारांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन महाराष्ट्र रेशन दुकानदारा संघटनेचे सहसचिव गुलाबराव नांद्रे व साक्री तालुका अध्यक्ष प्रणिव खैरनार यांनी केले आहे. ऑनलाईन अर्थांत कॅशलेस व्यवहारासाठी शासनाकडून जिल्ह्यातील सर्वच दुकानदारांना पास मशिन दिले गेले असून थम मॅच झाल्यावरच धान्य दिले जाणार आहे. परंतु, राज्य शासन दुकानदारांचा विचार न करताच त्यांच्या योजना रेशन दुकानदारांवर लादत आहे. त्यामुळेच रेशन दुकानदार सामुहिक राजीनामा देण्याच्या निर्णयापर्यंत येवून ठेपले आहेत.

अशा आहेत मागण्या
शासनाने सांगितल्याप्रमाणे मशिन बसविण्याचे कमिशनमध्ये वाढ द्यावी, हमाली, काटा पासींग, गाळाभाडे, लाईट बिल, मदतनीस याचा विचार झाला पाहिजे. एपीएल कार्डधारकांना माल देण्यात यावा. सर्वांसाठी साखर, केरोसीन देण्यात याव्यात अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास 1 जुलैपासून कोणताही दुकानदार मालाची उचल करणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. मागण्या मान्य न झाल्याने सर्व दुकानदार सामुहिक राजीनामे व पॉस मशिन जिल्हाधिकार्‍यांकडे जमा करणार असल्याचे म्हटले आहे. प्रसिद्धी पत्रकावर साक्री तालुका अध्यक्ष प्रविण खैरनार, उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव शशिकांत, सचिव गलाराव नांद्रे यांच्या सह्या आहेत.

‘भिक नको पण कुत्रा आवर’
66 रेशन दुकानदारांना हमाली मुक्त धान्य मिळावे, धान्यातील घट देण्यात यावी, रॉकेलचा कोटा पुर्ववत करावा, आधार कार्ड गोळा करण्याचे काम शासकीय यंत्रणेने करावे, मासिक मानधन मिळावे अशा मागण्यांसाठी शासनाकडे वांरवार पाठपुरावा करण्यात आला आहे. शासनाकडे पाठपुरावा करूनही काही एक उपयोग होत नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. आता रेशन व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी बायोमेट्रीक पद्धत अवलंबत पॉस मशिनवर थम्ब देऊन धान्य वाटप होणार असून ग्रामीण भागात त्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. यामुळे रेशन दुकानदार व कार्डधारक यांच्यावर ‘भिक नको पण कुत्रा आवर ’असे म्हणण्याची वेळ येणार असल्याचे मत महाराष्ट्र रेशन दुकानदार संघटनेचे सचिव गुलबाराव नांद्रे यांनी मांडले आहे.

शासन दरबारी पाठपुराव्यास अपयश
संघटनेने शासनस्तरावर वारंवार निवेदन देवून प्रशासनासी चर्चा करते. परंतु, आश्‍वसना शिवाय हाती ठोस काही लागत नसल्याची भावना रेशन दुकानदारांची झाली आहे. धान्य वाहतुकीत हमाली दुकानदारांकडून वसूल केली जाते. रेशन धान्यात घट येत असते. ती दुकानदारांच्या माथ्यावर मारली जाते. रेशन दुकानदारांना अत्यल्प कमीशनवर दुकानदार काम करीत आहे. या कमीशनवर दुकानदार काम करू शकत नाही त्यासाठी मासिक मानधन देण्यात यावे यासर्व मागण्यांसाठी सामुहिक राजीनाम्याचे हत्यार काढावे लागेल असे गुलाबराव नांद्रे यांनी निवेदनात म्हटले आहे. यामुळे पॉस मशीनच्या एकूणच दुकानदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.