दुकानमालकाची मेडीकल दुकानात गळफास घेवून आत्महत्या

0

जळगाव- तालुक्यातील कुसूंबा येथे मेडीकल दुकानमालकाने स्वतःच्या मेडीकलदुकानातच गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी 3.15 वाजता घडली. विजय कृष्णा ढाकणे वय 28 रा. रामेश्‍वर कॉलनी असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याने नैराश्यातून हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.

रामेश्‍वर कॉलनीतील पाणीपुरवठा कार्यालयाजवळ विजय ढाकणे हे कुटुंबांसह वास्तव्यास आहेत. दीड वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला. त्याचे कुसूंबा येथे गुरे ढोरांच्या औषधींचे मेडीकल दुकान आहे. शुक्रवारी नेहमीप्रमाणे ते मेडीकलवर गेले. याठिकाणी मेडीकलमध्ये त्यांनी गळफास घेतला. शेजारील दुकानदार यांना 3.15 वाजता ढाकणे यांनी मेडीकलमध्ये गळफास घेतला असल्याचे लक्षात आले. त्यानुसार दुकानदारांनी त्यांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांना प्रकार कळविला. नातेवाईकांनी धाव घेवून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. गेल्या काही दिवसांपासून ढाकणे नैराश्यात होते. त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. माहिती मिळताच रामेश्‍वर कॉलनीतील नगरसेवकांसह नागरिकांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती. विजय ढाकणे यांचे पश्‍चात्त आई, वडील, भाऊ, पत्नी असा परिवार आहे.

अयोध्यानगरातही प्रौढाने घेतला गळफास
जळगाव- शहरातील अयोध्यानगर येथे भिकाजी भागवत सोनवणे वय 35 यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 7.35 वाजेपूर्वी घडली. कुटूंबियांच्या प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी सोनवणे यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास निलेश भावसार करीत आहेत.