जळगाव – शहरातील फुले मार्केट येथील चार दुकानांचे एकूण 11 लाईट चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार रविवार, 16 जानेवारी रोजी समोर आला आहे. याबाबत दुकानदारांनी शहर पोलिसात तक्रार दिली आहे. लाईट चोरुन नेणारे संशयित तरुण दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहेत.शहरातील फुले मार्केटमध्ये अविनाश वर्मा यांचे मार्केटच्या तळमजल्यावर गाळा क्रमांक 86 येथे दुकान आहे.
या दुकानाच्या बाहेर सुरु असलेले दोन लाईट शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी चोरुन नेले. रविवारी सकाळी प्रकार समोर आला. यावेळी शर्मा यांच्यासह मार्केटमधील प्रदीप मंडोरे यांचे दुकानाबाहेरील 4 लाईट, श्री फॅशन या दुकानाचे 6 लाईट तर शीवा कॉस्मेटी या दुकानाचा एक मोठा लाईट असे लाईट चोरट्यांनी चोरुन नेल्याचेही समोर आले. दरम्याान शर्मा यांच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्यात चोरीचा प्रकार कैद झाला आहे.
यात चार ते पाच तरुण येतांना, त्यानंतर लाईट काढून हातात घेवून जातांना दिसून येत आहे. अविनाश शर्मा यांनी याबाबत शहर पोलिसात तक्रार देवून कारवाईची मागणी केली आहे.