शेंदूर्णी : येथे नगरपंचायत कडून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी किराणा व औषधी दुकानाच्या समोर ग्राहकांच्या हितासाठी योग्य अंतर चौकोन तयार करण्यात आले असून दोन दोन ग्राहकांना योग्य अंतर ठेवून जीवनावश्यक किराणा व औषधी घेता येणार आहेत. तसेच दुकानांवर खरेदी साठी येतांना मास्क किंवा तोंडाला रुमाल बांधणे बंधनकारक करण्यात आले असून मालक व दुकानातील कामगारांना पण मास्क आणि सॅनिटायझर वापरणे बंधन कारक करण्यात आल्याचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी सांगितले आहे. शेंदूर्णी येथे संध्याकाळी ६ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत फोगिंग मशीन द्वारे गल्लीबोळात फवारणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यावेळी नगर अभियंता भय्यासाहेब पाटील व नगरपंचायत कर्मचारी हजर राहणार आहेत.