दुकानाच्या गल्ल्यातून पैसे चोरणारा पाळधीच्या तरुणाला अटक

0

जळगाव – कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या एका दुकानात दुकानदाराचे लक्ष नसतांना गल्ल्यातून तीन हजार रूपये चोरणारा चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अक्षय प्रकाश छाडेकर (वय 21) रा. पहूर पाळधी ता.जामनेर असे संशयिताचे नाव आहे. न्यायालयात हजर केले असता न्या. ए.एस. शेख यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे

कृषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाला मार्केटमध्ये फिर्यादी दिपक किसन स्वामी यांचे दुकान आहे. या दुकानावर पाण्याचे जार, थरमास याची विक्री केली जाते. या दुकानाच्या गल्ल्यातील तीन हजार रूपये चोरी झाले होते. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजवरुन चोरीचा प्रकार समोर आला होता. याबाबत एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पाळधीहून संशयित अटकेत
स्थानिक गुन्हे शाखेचे बापू रोहम यांनी संशयितांच्या अटकेसाठी पोहेकॉ रा.का.पाटील, बापु पाटील, विनोद पाटील, किशोर राठोड, विजय पाटील, अरुण राजपुत, सचिन महाजन यांचे पथक तयार करुन रवाना केले होते. पथकाला संशयित पहूर पाळधी येथील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला सापळा रचुन पथकाने अटक केली. पुढील कारवाईसाठी आरोपीला एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.