दुकानाच्या वादातून एकावर विळ्याने चढवला हल्ला : दोघांविरोधात गुन्हा

A Man Stabbed a Man with a sickle in Sawada over a dispute over the demolition of a rented Shop : Crime Against Both सावदा : काकांच्या मालकीचे दुकान खाली करण्याबाबत विचारणा केल्यावरून एकावर विळ्याने वार करण्यात आला. सावदा येथे सोमवार, 14 रोजी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मनगटाला लागला विळा
हरेश उर्फ रामा सुभाष होले यांच्या काकांचे दुकान हे किरण प्रभाकर निंबाळे आणि आनंद रवींद्र जगताप या दोघांनी भाड्याने घेतले असून हे दुकान ते खाली करत नसल्याने रामा होले यांनी त्यांना याबाबत विचारणा केली. यामुळे किरण निंबाळे यांनी रीक्षातून विळा आणून त्यांच्यावर वार केला तर आनंद जगताप यांनी त्यांना पकडून ठेवले. या झटापटीत रामा होले यांच्या मनगटाला विळ्याच्या वार लागल्याने जखम झाली.

दोघांविरोधात गुन्हा
ही घटना सावदा शहरातील दुर्गा माता चौकातील सर्वज्ञ फर्निचर या दुकानाच्या समोर सायंकाळी सुमारे सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी हरेश उर्फ रामा सुभाष होले (45, रा. लक्कडपेठ, फैजपूर) यांनी सावदा पोलीस स्थानकात फिर्याद दिल्यावरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.