The Bhusawal trio stole clothes worth seven lakhs through fake keys जळगाव : भुसावळातील त्रिकूटाने बनावट चावीचा आधार घेत सात लाख 22 हजार 880 रुपये किंमतीचे कपडे लांबवले. ही घटना बळीराम पेठेत घडली. या प्रकरणी लक्की गिडवानी, आकाश फब्यानी व अन्वर मेमन (तिघे रा.भुसावळ) या तिघांविरुध्द मंगळवारी जळगाव शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
बनावट चावी केली तयार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल किसन बजाज (33, रा.सिंधी कॉलनी) यांचे बळीराम पेठेत विधाता मार्केटमध्ये पहिल्या मजल्यावर शिवम कलेक्शन नावाचे कापड विक्री दुकान आहे. दुकानापासून 500 मीटर अंतरावर 15 नंबर शाळेजवळ गोदाम असून त्यात मोठ्या प्रमाणावर कपडे ठेवण्यात आलेअ आहेत. या दुकानात लक्की गिडवानीसह चार तरुण कामाला होते. 12 जुलै रोजी पंजाबमधून 12 लाख रुपयांचे टी शर्ट व इतर कपडे आणून ते गोदामात ठेवण्यात आले होते. या कपड्यांची विक्री होत नसल्याने पंजाब मेलने ते परत केले जाणार होते परंतु तत्पूर्वीच गोदामाच्या कुलूपाची बनावट चावी तयार करीत सात लाख 22 हजार 880 रुपये किमतीचे तिघांनी लांबविले.
चोरी सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद होऊ नये म्हणून तोडले मेमरीकार्ड
विशेष म्हणजे चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद होऊ नये यासाठी त्यांनी मेमरीकार्ड तोडले. या प्रकरणी लक्की गिडवानी, आकाश फब्यानी व अन्वर मेमन (तिघे रा.भुसावळ) या तिघांविरुध्द मंगळवारी जळगाव शहर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.