दुकानातून चोरट्यांनी लांबविला ८१ हजारांचा ऐवज

0

सोनगीर । मोबाईल दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी मोबाईल व्हॉऊचर,रोकड आणि पतंजलीची सौंदर्य प्रसाधने असा ८१ हजाराचा ऐवज लंपास चोरी केल्याची घटना कापडणे ता.धुळे येथे घडली आहे. प्रमोद यशवंत चौधरी (वय २६) रा.कापडणे ता.धुळे या तरुण व्यावसायिकांने सोनगीर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार प्रमोद चौधरी यांचे कापडणे गावातील भवानी चौकात मोबाईल शॉप आहे.

रात्री चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातील ६० हजार रुपये किंमतीचे मोबाईल व्हाऊचर, २० हजाराची आणि एक हजार रुपये किंमतीचे पतंजलीचे सौंदर्य प्रसाधने,मनगटी घड्याळ असा ८१ हजाराचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सोनगीर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पीएसआय शिरसाठ करीत आहेत.