दुकानातून 15 हजारांची लांबविली रोकड

0

जळगाव । बी.जे मार्केट येथील अ‍ॅल्यूवर्ल्ड अ‍ॅल्युमिनीयम सेक्शन अ‍ॅण्ड ग्लासेस या दुकानातून अज्ञात इसमाने 15 हजार रुपये चोरून नेल्याची घटना आज मंगळवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी कर्मचारी आल्यावर उघडकीस आली आहे. दरम्यान, या दुकानात कामावर असलेल्या एका कर्मचार्‍याने ही चोरी केली असावी, असा संशय दुकान मालकाने व्यक्त केला आहे.

सव्वा लाख रुपये वाचले…
माँ वैष्णवी मार्केटींग नावाने बोरसे एक बक्षीस योजना चालवतात. त्यात प्रत्येक सभासदाकडून ते पैसे जमाकरून बक्षीस वाटप केले जाते. या योजनेचे सव्वालाख रुपये शनिवारी जमा झालेले होते. ते बोरसे यांनी गल्ल्यात ठेवलेले होते. विजय याने मंगळवारी सकाळी 8.15 वाजेच्या सुमारास भावसार यांच्याकडून दुकानाची चावी घेतली. दुकानावरील नोकर असल्याचे त्यांनीही लगेच चावी दिली. विजयने अगोदर ज्या खिडक्यांचे काम करतात. ते उघडून त्यातील इलेक्ट्रीक कटर, हातोडी आणि स्क्र्यू ड्रायव्हर घेतला. त्यानंतर त्याने ते दुकान बंद करून मालक बसत असलेले दुकान उघडले. त्यानंतर इलेक्ट्रीक कटरने गल्ल्याच्या ड्राव्हर तोडण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र ड्राव्हर तोडण्यासाठी वेळ लागला. त्या वेळात शफीक दुकानावर आल्याचे विजयला समजले. त्याने लगेच खालुनच पळ काढला. त्याच्या घाई घाईने जाताना काही दुकानदारांनी बघितले. मात्र तो बोरसे यांच्या दुकानात काम करीत असल्याने कोणालाही त्याच्यावर शंका आली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. तसेच विजयच्या कुसुंबा येथील घरीही पोलिसांचे एक पथक जाऊन आले. मात्र तो कामावर गेला असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.

बीजे मार्केटमध्ये जुन्या रेडक्रॉस सोसायटीसमोर असलेले दुकान क्रमांक 303/ए मध्ये विजय पुरूषोत्तम बोरसे (वय 45) यांच्या मालकीचे अ‍ॅल्यूवर्ल्ड नावाचे अल्यूमिनअमच्या खिडक्या आणि काचेचे तावदान तयार करण्याचे दुकान आहे. शनिवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास बोरसे यांनी दुकान बंद केले. रविवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास दुकान बंद केले. त्यानंतर सोमवारी धुलीवंदनामुळे दुकान बंद असल्याने ते नाशिक येथे निघून गेले. रात्री 8.15 वाजता परत आले. मंगळवारी सकाळी 8.40 वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकानावर काम करणारा शफीक शेख हा नोकर दुकान जवळ आला. त्याने दुकानाचे कुलूप उघडे असून अर्धे शटरही उघडलेले असल्याचा फोन बोरसे यांना केला. दुकानाची एक चावी बाजुला दुर्गादास भावसार यांच्या चहाचे दुकानावर ठेवलेली असते. त्यामुळे बोरसे यांनी शफीकला त्यांना विचारण्यासाठी पाठविले. त्यावेळी शफीकने भावसार यांच्याकडे जाऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांनी दुकानावरील दुसरा नोकर विशाल विजय सनेर (रा. कुसुंबा) हा सकाळी 8.15 वाजता चाव्या घेऊन गेल्याचे सांगितले. त्यानंतर शफीक याने दुकानावर येऊन बघितले. तर गल्ल्याजवळ इलेक्ट्रीक कटर पडलेले होते. तसेच काऊंटरवर लाकडाला भुसा पडलेला त्याला दिसला. त्यामुळे त्याने बोरसे यांना फोन करून चोरी झाल्याची माहिती दिली.

गेल्या सात आठ महिन्यांपासून बोरसे ल्युवर्ल्ड दुकानात विशाल सनेरे हा कार्यरत होता. तर दुकान मालक विजय बोरसे हे त्याला ल्यूमिनियम कारागीर म्हणून ओळखताहेत. बोरसे यांच्या म्हणण्यानुसार या संशयिताने चहावाला अप्पांकडून चाबी घेऊन दुकान उघडले. अंदाजे 15 हजाराची कॅश त्याने घेतली. अन्य कोणत्याही वस्तुला त्याने हात लावला नाही. त्या गोडावूनमधून त्याने हॅन्डकटर आणून कॅशकाऊन्टरचे लॉक तोडले