दुकान परवाने बंद

0

पिंपरी – दुकाने अधिनियम कायद्यात बदल करण्यात येत असल्यामुळे ऑनलाईन दुकान परवाने प्रक्रीया बंद झाली आहे. कामगार आयुक्तालय कार्यालयात संपर्क साधल्यास समाधानकारक माहिती मिळत नाही. त्यामुळे नव्याने व्यवसाय, दुकाने सुरू करणार्‍यांची, परवाने नुतनीकरण करणार्‍यांची मोठी गैरसोय होते आहे. छोटा-मोठा व्यवसाय, दुकाने काही सुरू करायचे असल्यास पहिल्यांदा व्यवसाय नोंदणी परवाना काढणे क्रमपप्राप्त असते.

भांडवल, जागा आदी सर्व गोष्टी पूर्ण होत असल्या तरी परवाना मिळाला नाही तर उद्योग सुरू करू शकत नाहीत. मात्र सध्या पहिल्याच टप्प्यावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुधारीत कायद्याची अंमलबजावणी कधी होणार याबद्दल अनभिज्ञता असल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. दुकाने, आस्थापना अधिनियम कायद्यानुसार पुर्वी दुकाने नोंदणी कार्यालयाकडे नोंदणी आणि नुतनीकरण केले जात होते. ही प्रक्रीया बंद होऊन तीन महिने झाले आहेत. तरी ही प्रक्रीया लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी होते आहे.