Shop broke in Dharangaon : Accused in Jalgaon Crime Branch’s net धरणगाव : तालुक्यातील पाळधी गावात दुकान फोडून मोबाईलसह अन्य ऐवज ल ांबवणार्या आरोपीच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. मिथुनसिंग मायासिंग बावरी (रा.कजगाव, ता.भडगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार लक्ष्मण अरुण पाटील, नाईक रणजीत अशोक पाटील, नाईक किशोर राठोड, विनोद सुभाष पाटील, मुरलिधर सखाराम बारी यांच्या पथकाने कजगाव येथून आरोपी मिथुनसिंग मायासिंग बावरी याला अटक केली. आरोपीच्या ताब्यातून पाच हजार पाचशे रुपये किंमतीचा हॅण्डसेट जप्त करण्यात आला तसेच पाळधी गावातील एक दुकानाचे कुलूप तोडून चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीला अधिक तपासार्थ धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.