यावल तालुक्यात अपघातांची मालिका ; जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार
यावल- दुचाकींच्या धडकेत चौघे जण जखमी झाल्याची तर डंपर-ट्रॅक्टर अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना तालुक्यात मंगळवारी घडली. जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जळगाव येथे हलवण्यात आले आहे.
विरावली रस्त्यावर दुचाकी धडकल्या
कोरपावली-विरावली रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झालेल्या अपघातात फकीरा प्रल्हाद बिर्हाडे (50, रा.महेलखेडी), किसन कडू अडकमोल (35, रा.कोरपावली), पवन भागवत पाटील (25) व प्रमोद गणेश पाटील (28, दोघे रा.विरावली) हे जखमी झाले.
ट्रॅक्टरवर डंपर धडकला
भुसावळ रस्त्यावर बीएसएनएल कार्यालयाच्यासमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला भरधाव वेगाने भुसावळकडे जाणारा डंपर (क्रमांक एम.पी.04 जी. ए.1436) वरील अज्ञात चालकाने ट्रॅक्टरला जबर धडक दिल्याने ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्याच्या कडेला उलटून डंपरमधील दामोदर श्रीधर साळुंके (65, रा.पारगाव, ता.चोपडा) हे गंभीर जखमी झाले तर डंपरचालक पसार झाला. अपघातात दुचाकीजवळ उभे असलेले अभय शिवाजी भोईटे यावल यांच्या अंगावर डंपर चालत येताना पाहून त्यांनी दुचाकी सोडून रस्त्याच्या कडेला उडी घेतल्याने ते बचावले मात्र या अपघातात त्यांची दुचाकी (क्रमांक एम.एच. 14 एन.9932) तसेच या ठिकाणी एका सायकलीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.