जळगाव । शहरातील नवीपेठेतील सुभाष चौक अर्बन को-ऑपरेटीव पतसंस्थेजवळ उभ्या असलेल्या दुचाकींमधून गेल्या सात ते आठ दिवसांपासून पेट्रोल चोरले जात होते. शनिवारी रात्री 10 वाजता अॅक्टिवा या मोडेड दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी दुचाकींच्या नळ्या काढून त्या ठिकाणी बाटल्या लावून बाजुलाच उभे होते. दरम्यान, काम आटोपून एक कर्मचारी त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला दुचाकीला बाटली लावली दिसली. तर दोन अज्ञात तरूण जवळच उभे असल्याने त्याला संशय येताच हेच पेट्रोल चोर असवो म्हणून त्या कर्मचार्याने त्यांच्याकडे धाव घेतली. मात्र, दोघांनी अॅक्टिवा या दुचाकीवरून धुम ठोकली.
अनेक वाहनातून पेट्रोल चोरी
सुभाष चौक अर्बन को-ऑपरेटीव पतसंस्थेजवळ लावण्यात आलेल्या दुचाकींमधून रात्री 10 वाजेच्या सुमारास चोरट्यांकडून पेट्रोल काढून चोरी गेले जात होते. तर काही दुचाकींच्या तर चोरट्यांनी नळ्याच कापल्याचे दिसले. यामुळे वाहनधारक पेट्रोल चोरट्यांच्या या त्रासापासून संतप्त झाले होते. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून चोरट्यांचा त्रास सहन करावा लागत होता. दरम्यान, पंतसंस्था परिसरात पथदिवे नसल्यामुळे चोरटे अंधाराचा फायदा घेत पेट्रोल चोरी करत आहे. दरम्यान, पंतसंस्थेजवळ असलेल्या दैनिकाच्या कार्यालयातील कर्मचारीच्या वाहतनातून तर चक्क चोरट्यांनी संपूर्ण पेट्रोलच चोरले. गेल्या सात ते आठ दिवसात चोरट्यांनी दहा ते बारा वाहनातून पेट्रोल चोरले आहे.
चोरट्यांनी कापल्या दुचाकीच्या पेट्रोल नळ्या : गस्त वाढविण्याची मागणी
शहरामध्ये रात्रीच्या वेळी दुचाकींमधून पेट्रोल चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढीस लागले आहेत. मध्यरात्री दुचाकीच्या पेट्रोलची पाईप काढून पेट्रोल चोरले जात आहे. शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास नवीपेठेतील सुभाष चौक अर्बन को-ऑपरेटीव पतसंस्थेजवळ उभ्या असलेल्या पंधरा ते वीस दुचाकींपैकी सात ते आठ दुचाकींमधून पेट्रोल चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पेट्रोल चोरण्यासाठी पाईप काढताना वाहनाचे नुकसानही केले जात आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.शहरात मोटारसायकल, घरफोडी नंतर आता पेट्रोल चोर देखील सक्रीय झाले आहेत. त्यामुळे वाहनांमधील पेट्रोल चोरीचे प्रकार वाढीला लागले आहेत. दरम्यान, पेट्रोल चोरांचे फावत असून पोलिसांनी रात्रीच्यावेळी अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. सध्या पेट्रोलचे दर वाढलेले आहेत. अशावेळी पेट्रोल चोरून विकत असल्याचा अंदाज नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.
चोरट्यांचा केला पाठलाग
शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास अॅक्टीवावरून आलेल्या दोन चोरट्यांनी काही अंतरावर दुचाकी उभी करून पंतसंस्थेजवळ लावलेल्या एका दुचाकीची पेट्रोलची नळी काढून बाटलीत लावली. यानंतर ते पुन्हा त्यांच्या दुचाकीजवळ उभे राहिले. काम संपले असल्याने पंतसंस्थेजवळील एका संस्थेतील कर्मचारी काम आटोपून घरी जाण्यासाठी दुचाकीजवळ येताच त्याला पेट्रोल काढण्यासाठी लावलेली बाटली दिसली.
त्यानंतर त्याला दोन अज्ञात तरूण दिसताच हेच पेट्रोल चोर असावेत म्हणून कर्मचार्याने त्यांच्याकडे धाव घेतली. मात्र, दुचाकीमालक आपल्याकडे येत असल्याचे पाहताच दोन्ही चोरट्यांनी दुचाकीवरून धुम ठोकली. गेल्या काही दिवसांपासून या चोरट्यांनी अनेक वाहनातून पेट्रोल चोरले आहेत.