दुचाकीची कारला धडक; 2 जण जखमी

0

पारोळा । तालुक्यातील म्हसवे शिवारातील दर्शन हॉटेल समोर दुचाकीला कारने (एमएच 18 एजे 6834) धडक दिल्याने किसान महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापकयुवराज यशवंत पाटील व त्यांची पत्नी एनईएस गर्ल्स हायस्कुलच्या मुख्याध्यापिका मालतीबाई युवराज पाटील हे बाहुटे येथे मौतीत जात असतांना हा आज दुपारी अपघात होऊन त्यात ते दोघे गंभीर जखमी झालेत. त्यांना घटनास्थळावरून 108 रुग्णवाहिकेत कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात येऊन तेथे त्यांचेवर प्रथमोपचार करून धुळे येथे हलविण्यात आले. डॉ.राजेश पाटील यांच्याकडे प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ नाशिक येथे दोघांना हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे नाशिक येथिल डॉक्टरांनी सांगितले. यावेळी निवृत्त मुख्याध्यापक पी.बी.पाटील, डा. भागवतराव पाटील, प्रमोद पाटील, एनईएस हायस्कुलचे शिक्षक सचिन पाटील, रवींद्र ठाकरे, धर्मेंद्र शिरूळे आदींनी जखमींची भेट घेतली.